आम्ही उद्या बहुमत सिद्ध करू – रावसाहेब दानवे

मुंबई : राज्यीाल सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वपुर्ण निर्णय दिला आहे. राज्यात उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.दरम्यान, ही बहुमत चाचणी उद्या संध्याकाळी होणार आहे या पार्श्वभूमीवर भाजपची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीविषयी रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना याविषयी अधिक माहिती दिली. दरम्यान आज भाजपच्या कोअर कमिटीची देखील बैठक आज आयोजित करण्यात आली आहे.


आज सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्याचा आम्ही आदर करतो. न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्याचा जो आदेश दिला आहे त्याला अनुसरून आम्ही बहुमत सिध्द करून दाखवू. आज रात्री 9 वाजता गरवारे क्‍लबमध्ये भारतीय जनता पक्षातील नेत्यांना आम्ही एकत्र करून पुढील दिशा ठरवली जाईल. अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.

दरम्यान कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत बाळासाहेब थोरात यांच्या नावावर कॉंग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.