राज ठाकरेंना करोना झाला तर आम्ही जबाबदार राहणार नाही : विजय वडेट्टीवार

मुंबई – मराठी भाषा दिनानिमित्त आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी स्वाक्षरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तोंडाला मास्क लावले नव्हते. यावरून राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरेंना करोना झाला तर सरकार जबाबदार राहणार नाही, असे वक्तव्य केले आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले कि, राज ठाकरे हे राज्यातील मोठे नेते आहेत. त्यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे. त्यांनी तोंडाला मास्क लावावा ही आमची विनंती आहे. पण त्यांनी मास्क घातला नाही आणि त्यांना करोना झाला तर त्याला सरकार जबाबदार राहणार नाही, अशी टिकात्मक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

दरम्यान, दादरमधील शिवाजी पार्क येथे झालेल्या मराठी स्वाक्षरी मोहीम कार्यक्रमानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सगळ्या कार्यक्रमांना गर्दी होते. सरकारच्या कार्यक्रमांना गर्दी होते. ते तिथं धुडघुस घालू शकता. शिवजयंती, मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली जाते. एवढं जर कोरोनाचं संकट पुन्हा येतंय असं दिसत असेल तर सगळ्या निवडणुका पुढे ढकला, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

तसेच तुम्ही मास्क घातलेला नाही? असे प्रत्रकारांनी विचारताच मी मास्क घालतच नाही, मी तुम्हालाही सांगतो, असे उत्तर राज ठाकरे यांनी दिले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.