‘महिला अत्याचाराविरोधात कडक कायदे करणार’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

जळगाव – आता महिलांना घरात बसून एफआयआर दाखल करता येणार आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आम्ही राज्य सरकारसोबत आहोत. महिला अत्याचारावर शिक्षेसाठी कायदे कडक करणार आहोत. महिलांवर अत्याचार करणारा वाचला नाही पाहिजे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी केले.
जळगाव येथे ‘लखपती दिदी’ योजनेच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाला मराठीतून सुरूवात करत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर नेपाळमध्ये झालेल्या बस अपघातातील मृतांना श्रद्धाजंली वाहिली.
ते म्हणाले की, जळगावमध्ये मला महिलांचा महासागर दिसत आहे. बचत गटासोबत जोडल्या गेलेल्या माझ्या महाराष्ट्रातील बहिनींना मोठी मदत झाली आहे. महाराष्ट्राचे संस्कार हे विश्वभरात पसरले आहेत. पोलंडमध्ये मला महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन झाले. पोलंडमधील अनेक माता बहिणींना कोल्हापुरातील राज घराण्याने आश्रय दिला. जळगाव ही संत मुक्ताईची भूमी आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
नरेंद्र मोदी म्हणाले, आता हे सर्व ट्रेलर आहे, यापुढे आम्ही महिलांसाठीच्या योजना वाढवणार आहोत. ग्रामीण भागातील महिला उत्पन्न वाढीसह देश मजबूत करत आहेत. आधुनिक शेतीसाठी नारीशक्तीला नेतृत्व देत आहोत, यातून नवीन विचार पुढे येईल. पूर्वी मुलींसाठी बंद असलेली क्षेत्र आम्ही खुली करत आहोत. केंद्र सरकारच्या बजेटमध्ये महिलांसाठी मोठी तरतूद असेल, असेही ते म्हणाले.
मला सर्व महिलांमध्ये राजमाता जिजाऊंची आणि सावित्रीबाई फुलेंची छाप दिसत आहे. 2 महिन्यांत 11 लाख लखपती दिदी झाल्या आहेत. मोदी सरकारने महिलांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. आधीच्या सरकारचे 70 वर्षे एका तराजूत ठेचा आणि माझ्या सरकाच्या काळातील कामे एका आमच्या इतकी महिलांची कामे कुणी केली नाहीत. महिलांना लोन देऊ नका असे अनेक जण सांगत होते. पण मला माझ्या आई- बहिणींवर विश्वास आहे. त्यांच्यात काम करण्याची क्षमता आहे. आता आम्ही 20 लाखापर्यंम मुद्रा लोन देणार आहोत, असेही त्यांनी जाहीर केले आहे.
50 लाख महिलांना लखपती बनवणार- अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मोदींच्या नेतृत्वातील विकासाचा रथ जळगावात आला आहे. मी आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनात एवढ्या प्रचंड संख्येने महिलांनी महाराष्ट्रात पंतप्रधानांचे स्वागत केल्याचे पाहिले नव्हते. हे मी पहिल्यांदाच पाहत आहे. देशातील 3 कोटी महिलांना लखपती बनविण्याचे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे. महाराष्ट्रातील 50 लाख महिलांना लखपती बनवणार आहे.
महिलांना संधी दिली तर त्या विश्व बदलू शकतात. महिला अर्थव्यवस्थेचा मुख्य धारेत आल्या तरच विकास होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाचा कारभार 2029 पासून महिलांकडे देणार आहेत. महाराष्ट्रातील 75 लाख परिवार हे बचत गटापासून जोडले आहे. 2 कोटी जनतेला बचत गटाशी जोडण्याचा मानस त्यांनी बाेलून दाखवला. सध्या मोदींच्या नेतृत्वात महिलांचा विकास सुरू आहे.
-देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री





