येत्या काही वर्षांत पुण्याला सर्वोत्तम बनवू : मुख्यमंत्री

पुणे – गेल्या वीस वर्षांपासून पुण्याचा विकास खुंटला होता. परंतु, तीन ते चार वर्षांत या सर्व कामांसाठी निधी उपलब्ध करून देऊन ही विकासकामे सुरू केली आहेत. पुणे शहर उत्तम आहेच, मात्र येत्या काही वर्षांत या शहराला सर्वोत्तम बनवू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचे दोन दिवसीय महाशिबीर आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी महेश महाविद्यालयात आयोजित केले आहे. या शिबिराचे उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले, महेश विद्यालयाचे लाहोटी, रा. स्व. संघ पुणे महानगर कार्यवाह महेश करपे यावेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, सामान्य लोकांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने विविध योजना आखल्या आहेत. त्या जमिनीवर कार्यान्वित केल्यामुळे शेवटच्या घटकाला त्याचा लाभ मिळतो आहे. लोकांना अशा योजनांची गरज आहे. त्यामुळेच या योजनांना ग्रामीण भागासह शहरात ही प्रतिसाद मिळत आहे. 2020 पर्यंत प्रत्येकाला घर हे स्वप्न पूर्ण करणार आहोत. गॅस, बॅंक खाते, वीज, आरोग्यसेवा, मोठ्या प्रमाणात या सरकारने पुरवल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन होऊन त्यांचे जीवनमान उंचावत आहे. त्यामुळे गरजूंना प्रत्यक्ष लाभ मिळणार नाही, तो पर्यंत योजनांची माहिती देण्याचे कार्य सुरू ठेवा. त्यांच्या अडचणी दूर करून त्यांना लाभार्थी बनवा अशा सूचना ही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या. आमदार मेधा कुलकर्णी यांनी प्रस्ताविक केले. यावेळी विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा तसेच कोथरूड मतदारसंघातील वारकरी सांप्रदाय भजनी मंडळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)