पुणे कॅन्टोन्मेंट – देशाचे सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा मॉब लिंचिंगविरोधी (झुंडशाही) कायदा लागू करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांनी सांगितले.
बागवे यांच्या प्रचारार्थ आज काशेवाडी, हरकानगर, जुना मोटर स्टॅंड परिसरामध्ये पदयात्रा काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी फुलं व गुलाब पाकळ्यांची उधळण करून बागवे यांचे स्वागत केले. यावेळी नागरिकांशी संवाद साधत असताना राज्य व देशात वाढत्या सामूहिक हल्ल्यांच्या घटनांविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. आतापर्यंत भटके-विमुक्त दलित व मुस्लीम तरुणांच्या जातीय व धार्मिक विद्वेशातून करण्यात आलेल्या हत्या या देशाच्या सार्वभौमत्वाला मारक असून त्या थांबविण्यासाठी राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातदेखील कायदा करण्यासाठी आग्रही राहणार असल्याचे बागवे म्हणाले.
नगरसेवक रफिक शेख, अविनाश बागवे, शिलार रतंगिरी, राहुल डंबाळे, बबलू सय्यद, सुरेखा खंडागळे, दयानंद अडागळे, सुरेश व्यास, सुंदरम मुदलियार, अरूण गायकवाड, विठ्ठल थोरात, सुनील भावकर, उमर शेख, राजू शेख, रईस कुरेशी, सुनील परदेशी, शिवराम बिबवे, मीरा दोडके, मीरा बिगे, कविता जाधव, विनोद कराळे, भारत वाघमारे, अशोक गायकवाड, शकिल शेख, सुरेश भंडारी, अभिजीत आढाव, रुपेश शेलार यांच्यासह महा आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.