पुणे – पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढावी. मतदारांमध्ये जागृती व्हावी, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मतदार जागरुकता व सहभाग कार्यक्रम अंतर्गत मतदारसंघाच्या विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये मतदानाचा हक्क बजावण्याबाबत विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्रे भरुन घेण्यात आली.
“मतदार जागरुकता व सहभाग कार्यक्रम’अंतर्गत मतदारसंघातील महाविद्यालयांमधील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना संकल्पपत्राच्या चार हजार प्रतींचे वाटप करण्यात आले. या विद्यार्थ्यांचे आई-वडील, बहीण-भाऊ, आजी-आजोबा तसेच कुटुंबातील इतर सदस्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पुढाकार घेतला.