वॉशिंग्टन: भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुरळीत राहावेत आणि त्या दोन्ही देशांतील जनतेची शांतता अबाधित राहावी यासाठी अमेरिका सर्व शक्य ते प्रयत्न करील, अशी ग्वाही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.
अध्यक्ष ट्रम्प यांचे दोन्ही देशांतील जनतेवर प्रेम आहे. त्यांना कायमच शांतता अनुभवता यावी यासाठी जे जे शक्य आहे ते प्रयत्न करू, असा निर्धार अध्यक्ष ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे अशी माहिती त्यांच्या प्रवक्त्याने आज व्हाईट हाऊस येथे पत्रकार परिषदेत बोलतना दिली.
भारत हा अमेरिकेचा महत्वाचा भागीदार आहे असे प्रतिपादन अमेरिकेचे विदेश व्यवहार मंत्री माईक पॉम्पेओ यांनी या आधीच केले आहे. तसेच अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनीही चीन विरोधीतील संघर्षाच्या बाबतीत भारताचीच बाजू उचलून धरली आहे. अध्यक्ष ट्रम्प यांच्या या भारत समर्थनाच्या भूमिकेचे अमेरिकेतील भारतीयांनी स्वागत केले आहे.