संदीप खर्डेकर यांची आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत बैठक
पुणे – ग्रामपंचायत हद्दीतील सदनिकांचे करार आणि जमिनीच्या तुकड्याची दस्त नोंदणी बंद केल्याबाबत भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी माजी महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन केले होते.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील विविध ग्रामस्थ, सदनिकाधारक व बांधकाम व्यावसायिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी पाटील यांनी विषय समजून घेतला. याबाबत राज्य सरकारमधील संबंधित मंत्री व महसूल खात्याचे सचिव नितीन करीर यांच्यासोबत बोलणे करून यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
ऍड. नितीन दसवडकर व ऍड. मयुर दुधाणे यांनी माहिती दिली. याप्रसंगी संदीप खर्डेकर, उत्तमनगरचे सरपंच सुभाष नाणेकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सारंग राडकर, ऍड. मयुर दुधाने, अतुल आप्पा धावडे, ऍड.नितीन दसवडकर, किरणभाऊ वांजळे, अमोल आहेर पाटील, सतीश वांजळे, अक्षय मोरे, सुधीर धावडे आदी उपस्थित होते.