पठारेंच्या सोबतीने वडगावशेरीचा विकास करू

पुणे – वडगावशेरी हा भाजपचा बालेकिल्ला आहे. मी आणि माजी आमदार बापू पठारे एकत्र वडगावशेरीचा विकास करणार आहोत. पठारेंच्या प्रवेशामुळे भाजपची या मतदारसंघात ताकद आणखी वाढली आहे. त्यामुळे आपला विजय निश्‍चित असल्याची भावना वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार जगदीश मुळीक यांनी पठारे यांच्या प्रवेशाबाबत बोलताना व्यक्त केला.

वडगाव शेरीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, माजी नगरसेवक महादेव पठारे यांनी कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. यामुळे भाजप महायुतीचे उमेदवार जगदीश मुळीक यांना फायदा होणार असल्याची राजकीय चर्चा आहे.

वर्षा बंगल्यावर पठारे यांच्यासह माजी नगरसेवक महादेव पठारे, पंढरीनाथ गरूड, संतोष पठारे, सचिन पठारे, यशवंत चव्हाण, राहुल पठारे, कैलास पठारे, संतोष दरेकर, विजय डफळ, संजय माने, स्वप्नील पठारे, प्रसाद पठारे यांनी प्रवेश केला.

मुळीक म्हणाले, “या मतदार संघामध्ये भाजप महायुतीचे 17 नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे सहा नगरसेवक आहेत. बापूसाहेब पठारेंनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ताकद वाढली आहे. त्यामुळे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाच्या विकासला गती देणार आहे. तर पठारे म्हणाले, गेल्या पाच वर्षांत माझ्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने अन्याय केला आहे. मला बैठकीला बोलवणे टाळले. जो माझ्या पराभवाला कारणीभूत होता, त्याच उमेदवारला संधी देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.