हिंगणघाट प्रकरणावर रोहित पवारांचे आवाहन
मुंबई : हिंगणघाट प्रकरणामुळे राज्यासह देश पुर्णपणे हादरून निघाला आहे. त्यातच आज सकाळी मागच्या आठ दिवसापासून या प्रकरणातील पीडिता मृत्युशी झुंज देत होती मात्र आज सकाळी या प्रकरणातील पीडितेची ही झुंज थांबली आहे. कारण सोमवारची सकाळ उजाडली अन् पीडितेची प्राणज्योत कायमची मालवली.
हिंगणघाटमधील पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्व स्तरातून हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे. सर्व क्षेत्रातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच आता शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करून या घटनेबद्दल शोक व्यक्त करत नागरिकांना आवाहन केल.
धक्कादायक, संतापजन घटनेची अखेर अत्यंत वेदनादायी झाली. वर्धा जळीतकांडातील पिडितेचा दुर्दैवी मृत्यू हा विकृतीचा बळी ठरला आहे.पिडितेच्या आत्म्यास शांती लाभावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो पण समाजातील विकृतीची राख करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू हीच पिडितेला खरी श्रद्धांजली ठरेल.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 10, 2020
हिंगणघाटमध्ये आरोपीने पेट्रोल टाकून पेटवून दिल्याने पीडिता भाजली होती. नागपूरमध्ये उपचार सुरू असताना सोमवारी तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूबद्दल आमदार रोहित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. धक्कादायक, संतापजनक घटनेची अखेर अत्यंत वेदनादायी झाली. वर्धा जळीतकांडांतील पीडितेचा दुर्दैवी मृत्यू हा विकृतीचा बळी ठरला आहे. पीडितेच्या आत्म्यास शांती लाभावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पण समाजातील विकृतीची राख करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू हिच पीडितेला खरी श्रद्धांजली ठरेल, असं आवाहन रोहित पवार यांनी केलं आहे.