Nitesh Rane । सिंधुदुर्गमधील किल्ल्यावर उभारलेला शिवाजी महाराजांचा पुतळा बनविणाऱ्या जयदीप आपटे नावाच्या व्यक्तीला आम्ही सोडणार नाही, आम्ही त्याला नक्की आपटणार असं म्हणत नितेश राणेंनी पुतळा बनवणाऱ्या ठेकेदार आपटेला इशारा दिला आहे.
सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. त्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पहिली कारवाई करत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. जयदीप आपटे आणि डॉ. चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज पुण्यात माध्यमांशी बोलतांना निलेश राणे आणि जयदीप आपटे यांचा फोटो दाखवत सनातन प्रभातशी यांचा संबंध काय असा सवाल उपस्थित केला आहे. यावर आता निलेश राणे यांनी माध्यमांशी बोलतांना पलटवार केला आहे.
सांगलीत माध्यमांशी बोलतांना नितेश राणे म्हणाले,’ सिंधुदुर्गमधील किल्ल्यावर उभारलेला शिवाजी महाराजांचा पुतळा बनविणाऱ्या आपटे नावाच्या व्यक्तीला आम्ही सोडणार नाही, आम्ही त्याला नक्की आपटणार आहे ते पुढे म्हणाले, विशाळगडावर हिरव्या चादरी टाकत आहेत, महाराजांच्या गड किल्ल्यांची काय अवस्था करून ठेवली आहे. सिंधुदुर्गकडे जाणाऱ्या नेत्यांना विशाळगडवरील अतिक्रमण दिसत नाही का ? असा सवालही राणेंनी विचारला आहे.
तत्पूर्वी, सुषमा अंधारे यांनी शिल्पकार जयदीप आपटे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस आहे. जयदीप आपटे हा अनुभव नसलेला मूर्तीकार होता. तरीही त्याला शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम कसे देण्यात आले? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्यावरुन आज सुषमा अंधारे यांनी सवाल उपस्थित केले आहेत. यावेळी त्यांनी नितेश राणे आणि जयदीप आपटे यांचे एकत्रित फोटोही दाखवले आहेत. त्यानंतर, नितेश राणेंनी पलटवर करताना आपटेला आम्ही आपटणार असल्याचं त्यांनी म्हटलं.