जनतेच्या विकास आणि प्रगतीसाठी आम्ही नेहमीच साथ देऊ

नवी दिल्ली – पंतप्रधान म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी शपथ घेतली. शपथविधीनंतर पंतप्रधान म्हणून मोदींची दुसरी इनिंग आता सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नव्या मंत्रीमंडळाचे ट्विटद्वारे अभिनंदन केले आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन ट्विट करण्यात आले आहे की,’आमच्या पक्षातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नव्या मंत्रीमंडळाचे ट्विटद्वारे अभिनंदन करतो. देश आणि देशातील जनतेचा विकास आणि प्रगतीसाठी आम्ही त्यांना नेहमीच साथ देऊ.’


दरम्यान, लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारणीकडे आपला राजीनामा सुपूर्द केला होता मात्र काँग्रेस कार्यकारणीने त्यांचा राजीनामा एकमुखाने नाकारत काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी हेच सर्वोत्तम नेते असल्याचं म्हंटल होतं. मात्र राहुल गांधी हे आपल्या राजीनाम्याच्या निर्णयावर अद्याप ठाम आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालनंतर काँग्रेस पक्षामध्ये अनेक अंतर्गत हालचाली सुरु आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)