खड्ड्यात गेला कायदा आणि आचारसंहितेचे आम्ही बघून घेऊ – संजय राऊत

मुंबई – निवडणुकीचे वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. अशातच आचारसंहिता भंग केल्याच्या अनेक तक्रारी होत असतात. अशातच आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एका प्रचारसभेत केलेले वक्तव्य हे त्यांना चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी या सभेमध्ये बोलताना खड्ड्यात गेला कायदा आणि आचारसंहितेचे आम्ही बघून घेऊ असे म्हंटले आहे. तसेच पुढे बोलताना संजय राऊत यांनी, जे आमच्या मनात आहे ते नाही बोलले तर, गुदमरल्यासारखे होते असे ते म्हणाले.

त्यामुळे संजय राऊत यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी बसपच्या अध्यक्षा मायावती आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करत प्रचारबंदी घातली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.