‘अमाप संपत्ती कमवायची आणि शेवट जाताना महाराष्ट्रालाच बदनाम करून जायचं’

मुंबई : पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकार बॅकफूटला गेल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांच्याकडील गृहखातं जाणार किंवा मुंबई पोलीस आयुक्तांची बदली होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र अनिल देशमुख सेफ राहिले आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली झाली. बदलीमुळं नाराज झालेल्या परमबीर सिंग यांनी आज खळबळजनक आरोप केले आहे.  यानंतर आता राष्ट्रावादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी परमबीर सिंग यांच्यावर परखड टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाल्या रूपाली चाकणकर

‘नोकरीसाठी महाराष्ट्रात यायचं, राज्याची नोकरी करतानाच विरोधीपक्षाची चाकरी करायची, अमाप संपत्ती कमवायची आणि शेवट जाताना महाराष्ट्रालाच बदनाम करून जायचं.’ म्हणत त्यांनी सिंग यांच्यावर टीका केली आहे, 

त्या पुढे म्हणाल्या, ‘मुंबईत चार कोटी रूपयांचे दोन फ्लाॅट तर हरियाणात आपल्या गावी त्यांनी चार कोटी रुपयांचे घर घेतल्याचा आरोप परमबीर सिंग यांच्यावर केला आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावावर कोट्यावधीची संपत्ती देखील आहे. अंधेरीतल्या वसुंधरा सोसायटीत 48.75 लाख रूपयांचा फ्लाॅट घेतला आहे. तर 2019 मध्ये त्यांनी 14 लाख रुपयांची जमिन खरेदी केली आहे, हरियाणात त्यांच्या आणि त्यांच्या घरच्यांच्या नावे संयुक्तपणे चार कोटी रूपयांचे घर आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.