मुंबई -हिंदी चित्रपटसृष्टीतील तरुण आणि हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंग राजपूतने वयाच्या 34 व्या वर्षी मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याचे निधन जितके दुःखदायक होते, तितकेच ते धक्कादायकही होते. अद्याप सुशांतने आत्महत्या नेमकी का केली याचा तपास पोलीस करत आहेत. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी पोलीस, ईडी सुप्रीम कोर्ट सर्वत्र तपास, याचिका, खटले सुरू आहेत.
सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याच्या प्रकरणाचा तपास CBI कडे सोपविण्यात यावा अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. सुशांतची आधीची प्रेयसी आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सुशांतसाठी न्यायाची मागणी केली आहे.
दरम्यान, अंकिता पाठोपाठ कंगना रनौत, वरुण धवन, क्रिती सेनॉन यांनी देखील #CBIForSSR कॅम्पेनला पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सुद्धा सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास CBI कडे सोपविण्यात यावा अशी मागणी सर्वांकडून होत आहे.