शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही तुमच्यासोबत; चाहत्यांचा निर्धार

मॅंचेस्टर – शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठापूर्ण झालेल्या लढतीत रवींद्र जडेजा याने भारतास विजय मिळवून देण्यासाठी शर्थीची झुंज दिली. मात्र, त्याची ही झुंज संघास अंतिम फेरी गाठण्यासाठी अपुरीच पडली. न्यूझीलंडने हा सामना १८ धावांनी जिंकला व अंतिम फेरीत प्रवेश केला. विजयासाठी २४० धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव ४९.३ षटकांत २२१ धावांवर आटोपला. न्यूझीलंडने ५० षटकांत ८ बाद २३९ धावा केल्या होत्या.

धोनी आणि जडेजा यांनी धावफलक सतत हालता ठेवत विजयाच्या आशा पल्लवित केल्या. एकवेळ अशक्‍य वाटणारा विजय त्यांनी समीप आणला होता. धोनी रनआऊट झाला व सर्व क्रिकेटप्रेमींच्या आशेवर पाणी फिरले. आणि भारतीय संघ विश्वचषकातून बाहेर पडला. परंतु, पराभवातही क्रिकेटप्रेमी, बॉलिवूड स्टार्सनी तसेच दिग्गज व्यक्तींनी भारतीय संघाचे सर्मथन केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.