मुंबई : मागील जवळपास एक महिन्यांपासून आपल्या हक्कासाठी एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी पाठिंबाही दिला. आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली होती.
आझाद मैदान, मुंबई येथे तुळजापूर आगारातुन आलेल्या माझ्या एसटी कर्मचारी बांधवांनी माझी भेट घेऊन मला आई तुळजाभवानीचा फोटो व कवड्याची माळ माझ्या गळ्यात घातली. pic.twitter.com/mjhZQ4kAGo
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) November 22, 2021
मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचं राज्य सरकारने बुधवारी पत्रकार परिषद घेत जाहीर केलं. यात एसटी कामगार हे विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. यानंतर आज भाजप आमदार गोपीचंद पडळकर तसेच सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी आझाद मैदानातील आंदोलन आम्ही तात्पुरतं स्थगित कर असल्यांच जाहीर केलं.
सदाभाऊ खोत म्हणाले, ‘मी आणि गोपीचंद पडळकर यांनी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला. काल झालेला पत्रकार परिषदेनंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचं राज्य सरकारने जाहीर केले आहे. पगार वाढीच्या अखेर 16 दिवसांनंतर सरकारला जाग आली. मात्र अजूनही एसटी कामगार हे विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत त्यामुळे कामगारांचा पहिल्या टप्प्यातील हा विजय आहे. पहिला टप्पा आम्ही जिंकला आहे. विलिगीकरणाचा लढा सुरूच राहणार आहे असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.’