आमच्याकडे कोणतीही अण्वस्त्रे नाहीत

तेहरान – आमच्याकडे कोणत्याही प्रकारची अण्वस्त्रे नाहीत, आणि नुकत्याच झालेल्या इन्स्पेशन मध्ये ही बाब पुन्हा स्पष्ट झाली आहे असा दावा इराणचे अध्यक्ष हसन रोैहानी यांनी केला आहे. आम्ही अण्वस्त्रे तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहोत असा काहींचा दावा आहे. पण आम्ही आमच्या सर्व संशयीत स्थळांवरील तपासणीला कोणतेही निर्बंध घातले नव्हते.

युरेनियम समृद्धीकरणाचा कार्यक्रम इराणने सुरू केला आहे. असा जागतिक तज्ज्ञांचा दावा आहे. पण त्याविषयी मात्र त्यांनी अधिक भाष्य केले नाही. अमेरिकेने इराणला आपला संशयास्पद अण्विक कार्यक्रम रद्द करण्याची जी डेडलाईन दिली आहे ती त्यांनी पाळावी यासाठी युरोपियन समुदाय प्रयत्नशील आहे. ब्रिटन, फ्रांस, आणि जर्मनी यांनी त्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्यांच्या या प्रयत्नांना फार यश आले नाही. इराणने समृद्ध युरोनियमचा तीनशे किलो पेक्षा अधिकचा साठा ठेऊ नये अशी सुचना अमेरिकेने त्यांना केली आहे.

पण त्यांनी सध्या त्या पेक्षा अधिकचा साठा जमा केला आहे हाच साऱ्या चिंतेचा केंद्र बिंदु आहे. पण त्याविषयी मात्र रौहानी हे काही भाष्य करीत नाहीत किंवा समृद्ध युरेनियमचा साठा कमी करण्याची कोणतीही वचनबद्धता ते देत नाहीत. ते जोपर्यंत ही वचनबद्धता देत नाहीत तो पर्यंत इराणवर कारवाईची टांगती तलवार कायम राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.