सुप्रिया सुळेंच्या प्रश्नाला रावसाहेब दानवेंचे उत्तर
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षातील नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. परंतु, मागच्या काही दिवसांपासून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भ्रष्टाचाराविरूद्ध आवाज उठवणाऱ्या सत्ताधाऱ्यांना डागाळलेले नेते कसे चालतात. त्यांना कोणत्या वॉशिंग मशीनमध्ये धुतले जाते, असा प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाला केला होता. सुळे यांच्या आरोपाला भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उत्तर दिले आहे. आमच्याकडे गुजरातची निरमा पावडर आहे. नेत्यांना पक्षात घेताना या पावडरने धुवून घेतो, असे दानवे म्हणाले.
Union Minister Raosaheb Danve Patil in Jalna, Maharashtra: BJP has a washing machine. Before taking anyone in the party, we wash them in the machine. We have the Nirma powder of Gujarat. (28.08.19) pic.twitter.com/WwGHvhEhbu
— ANI (@ANI) August 28, 2019
सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील भाजपाच्या नेत्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ज्यांच्यावर आरोप केले होते. त्याच नेत्यांना भाजपामध्ये घेतले जात आहे. हे डागाळलेले नेते आता सत्ताधाऱ्यांना कसे चालतात. त्यांना कोणत्या वॉशिंग मशीन धुतले जाते, असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. सुळे यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेत उत्तर दिले होते. आमच्या वॉशिंग पावडर नाही, तर डॅशिंग रसायन आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते. त्यावरूनही सुप्रिया सुळे यांनी नाशिक येथील सभेत टीका केली होती. सर्वच रसायने चांगली नसतात. काही रसायने घातक असतात. त्यामुळे त्यापासून सावध राहायला हवे, असे सुळे म्हणाल्या होत्या.