अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला इशारा
वॉशिंग्टनः आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन आणि अमेरिकेत सध्या व्यापारयुद्ध सुरू आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर जोरदार हल्ला चढवला आहे. चीनने लावलेल्या नव्या आयातावरील शुल्काच्या नियमावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला स्पष्ट इशारा दिला आहे. अमेरिकेतल्या कंपन्या ज्या चीनमध्ये कार्यरत आहेत, त्यांना चीन सोडण्याचं अपील केलं आहे. आम्हाला चीनची गरज नाही. खरं तर त्यांच्याशिवाय आमची चांगली प्रगती होईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
Our Country has lost, stupidly, Trillions of Dollars with China over many years. They have stolen our Intellectual Property at a rate of Hundreds of Billions of Dollars a year, & they want to continue. I won’t let that happen! We don’t need China and, frankly, would be far….
— Donald J. Trump (@realDonaldTrump) August 23, 2019
व्यापारयुद्धामुळे अमेरिकेची प्रगती संथ गतीने सुरू असून, जागतिक अर्थव्यवस्थाही कमकुवत होत आहे. शेअर बाजारांची स्थितीही फारशी चांगली नाही. तरीदेखील ट्रम्प यांनी चीनला इशारा देण्याचे धाडस केले आहे. आमच्या देशाला एवढ्या वर्षांत चीनमुळे खर्व डॉलरचं नुकसान सोसावं लागलं आहे. त्यांनी वर्षभरात अब्जो डॉलरच्या किमतीची आमची बौद्धिक संपदा लुटली आहे. त्यांना हे सुरूच ठेवायचं आहे. परंतु आम्ही असं होऊ देणार नाही. आम्ही चीनमध्ये कार्यरत असलेल्या अमेरिकी कंपन्यांना तात्काळ तिथून निघून दुसऱ्या देशांचा पर्याय शोधावा, असेही ट्रम्प यांनी सांगितले आहे.