संजय राऊत यांचे पुन्हा एकदा हटके ट्विट
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे आता आज महाविकास आघाडी सरकारला विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार आहे. तत्पूर्वी, शिवसेना नेते तसेच राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी पुन्हा एकदा हटके ट्विअ करुन महाविकास आघाडी विश्वासदर्शक ठराव सहजपणे जिंकेल असा दावा केला आहे.
आज
बहुमत दिन..
170+++++
हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं,
हमसे जमाना खुद है… जमाने से हम नहीं— Sanjay Raut (@rautsanjay61) November 30, 2019
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ठाकरे घराण्यातील पहिले आणि शिवसेनेचे ते तिसरे मुख्यमंत्री ठरले. गुरुवारी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या सहा मंत्र्यांनी शपथ घेतली. विश्वासदर्शक ठरावानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे.