आम्ही हवापाण्यावर गप्पा मारल्या

अजित पवारांचे मिश्‍लिक अंदाजात उत्तर : फडणवीस-पवार पुन्हा एकत्र आल्याने राजकीय चर्चांना आले होते उधाण

बारामती- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेता तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका लग्न समारंभानिमित्त एकत्र आले. त्यात योगायोग म्हणजे या दोघांची खुर्चीही शेजारी शेजारीच आल्याने लग्नसभारंभासह राजकीय गोटात उलट सुलट चर्चेला उधाण आले होते. मात्र, हा केवळ योगायोग असून आम्ही शेजारी बसून फक्‍त हवापाण्यावर चर्चा केल्याचे अजित पवार यांनी सांगून राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला. तसेच आम्ही दोघे शेजारी बसलो म्हणजे लगेच काहीतरी सुरू झालयं अस समजण्याचे कारण नाही, असे त्यांनी मिश्‍किल अंदाजत भेटीचे वर्णन केले.

शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस या तिन्ही पक्षांचे सूत जुळत असतानाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड करीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी हात मिळवणी करीत भाजप-राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहटेच सत्ता स्थापन केल्याचा बॉम्ब राज्यातील नागरिकांवर पडला अन्‌ एकच राजकीय खळबळ उडाली होती. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी गेल्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात सहभागी झाले व राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. या सत्ता स्थापनेनंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एका लग्नानिमित्त एकत्र आले व शेजारी-शेजारी खुर्चीवर बसले, त्यामुळे लग्नसंभारभांसह राज्यात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले; मात्र अजित पवार यांनी मिश्‍किल अंदाजात उत्तर देत या साऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला.

अजित पवार म्हणाले की, राजकीय व्यक्‍ती कधी कायमच्या एकमेकांचे शत्रू नसतात, सत्ताधारी किंवा विरोधक एकत्र आल्यानंतर एकमेकांना नमस्कार होतो, एकत्र बसतात चर्चा होते, यात दुसर काहीही नव्हत. संजय शिंदे यांनी आग्रहाने माझ्यासह इतरांना बोलावल होत, म्हणून त्या लग्नाला आम्ही गेलो होतो, खुर्च्या ठेवताना अशा ठेवल्या की माझी व देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची शेजारी शेजारी आली, इतकच काय तो योगायो. त्यामुळे शेजारी बसल्यावर आम्ही थोडीफार इकडची तिकडची चर्चा केली…त्यात कस काय पाऊसपाणी वैगेरे…यावरच आम्ही बोललो असे, सांगून

  • फडणवीसांच्या मुलाखतीवर बोलणार नाही…
    बारामतीची माझ्याकडे फार कामे आहेत. बारामतीचा आमदार असल्याने बारामतीकरांची कामे करणे हेच माझे एकमेव काम असून तेच मी करत राहणार आहे. बारामतीकरांनी 1 लाख 65 हजारांचे मताधिक्‍य देऊन जबाबदारी सोपविली आहे, त्यामुळे बारामती मतदारसंघांचे प्रश्‍न मार्गी लावणे हे माझे पहिले काम असून तेच मी करत आहे. मी देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीवर काहीही बोलणार नाही, असे सांगत फडणवीसांच्या मुलाखतीवर उत्तर देण्यास स्पष्टपणे नकार दिला.
  • अजित पवारांच्या मंत्रीपदाबाबत सस्पेस कायम
    अजित पवारांच्या बंडा शमल्यानंतर आपण शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या हितासाठी काम करणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद द्यावे, अशी राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांसह काही आमदारांची इच्छा आहे. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याने व त्याबाबत तिन्ही पक्षांचे कोणी नेते बोलत नसल्याने पवारांच्या पदाबाबत सस्पेस कायम आहे. तर खातेवाटपाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच काय ते अधिक विस्ताराने सांगू शकतील, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.