मुंबई: “मला अभिमान आहे मी भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे. ज्या पक्षाने सत्तेसाठी लाचारी केली नाही. एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करणार. बंगल्यात बसून आदेश देण सोपं असतं, आता सभागृहात उत्तर द्यायची आहेत. आम्ही गोळाबारूद घेऊन सज्ज आहोत”, असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले. नितेश राणे यांनी आज विधीमंडळात आमदारकीची शपथ घेतली.
जवळपास एक महिना चाललेल्या नाट्यमय घडामोळीनंतर महाराष्ट्र्रात सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झालेला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्रपक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापणा केली. उद्या महाविकास आघाडीचा सायंकाळी ५च्या सुमाराम शिवाजी पार्कवर शपथविधी होणार आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.
काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले नितेश राणे यांनी आज आमदारकीची शपथ घेतली. तसेच बंगल्यात बसून आदेश देण सोपं असतं, आता सभागृहात उत्तर द्यायची आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. विधानभवनात आज आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला.