छत्तीसगड – राज्यात २०२३ ची निवडणूकींच्या संदर्भात भाजप विरुद्ध काँग्रेस शाब्दिक वार सुरु झाला आहे. भाजप नेत्यांकडून काँग्रेस नेत्यांवर जहरी टीका करण्यात आली आहे. भाजपच्या सरचिटणीस पुरंदेश्वारी यांनी एका कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले आहे.
#WATCH “We appeal to you to work with resolve, through your hard work BJP will come to power in 2023….When you turn back and spit, then, Bhupesh Baghel and his cabinet will get swept away,” Chattisgarh BJP leader D.Purandeswari while addressing party workers in Bastar yesterday pic.twitter.com/R8Q9TKQ0YU
— ANI (@ANI) September 3, 2021
पुरंदेश्वारी यांनी टीका केली आहे की,’राज्यात भाजप कार्यकर्त्यांची संख्या एवढी जास्त आहे की, त्यांनी नुसत थुंकले तरी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे सरकार वाहून जाईल. अशी जहरी टीका त्यांनी केली आहे. त्या पुढे म्हणाल्या, २०२३ ची निवडणूक भाजपच जिंकणार आहे.
दरम्यान, त्यांचा या टिकेवर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी अभिनेता मनोज वाजपेयींच्या चित्रपटातील फेमस डायलॉगचा वापर करत सडेतोड उत्तर दिल आहे. ते म्हणाले,’ त्यांनी भाजपकडून असे वक्तव्य केले जाईल अशी अपेक्षा नव्हती असे म्हणत, ‘आसमान मे थुंकणे वालो, वो थुंक उडकर तुम्ही के चेहरे पर उडेगी’ असे उत्तर दिले आहे.