नवी दिल्ली – अमेरिकेतील वर्णद्वेषाचे लोण जगभर पसरत असताना क्रीडा क्षेत्रातूनही याबाबत खुलासे समोर येत आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू असलेल्या दोड्डा गणेश व अभिनव मुकुंद यांनीही वर्णद्वेषी टीकेचा सामना केल्याचा खुलासा केला आहे.
जॉर्ज फ्लॉइडची अमेरिकेत हत्या झाल्यानंतर जगभर वर्णद्वेषाविरुद्ध आंदोलने होत आहेत. वर्णद्वेषाची झळ आपल्यालाही बसल्याचे वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलसह भारतीय संघातील एक खेळाडू असलेल्या मुकुंदने आपल्यावर तेथे काही प्रेक्षकांनी वर्णद्वेषी टीका केल्याचा खुलासा केला आहे. त्याच्याबरोबरच गणेशनेही आपल्यालाही असाच अनुभव आल्याचे स्पष्ट केले आहे.