वजीर सुळका अवघ्या 15.30 मिनिटांत सर

आंबेगावातील कृष्णाने 20 मिनिटाचा विक्रम मोडला

आंबेगाव बुद्रुक – आंबेगाव येथील 23 वर्षांचा गिर्यारोहक कृष्णा मरगळे यांनी मागील वर्षी 20 मिनिटांमध्ये वजीर सुळका सर करून विक्रम केला होता. आता, तोच सुळका आवघ्या 15.30 मिनिटांमध्ये सर करून “वजीर’वीर कृष्णाने नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

बुद्धिबळातील वाजीरासारखा दिसणारा हा सुळका ठाणे जिल्यातील माहुली किल्यालगत आहे. सुळक्‍याची उंची 200 फूट असून, माहुली किल्ला हा समुद्रसपाटीपासून 2800 फूट आहे. चढाईतील कठिणटप्यांमुळे हा सुळका गिर्यारोहकांसाठी नेहमीच आकर्षित करत असतो.

शनिवारी (दि.12) सिंहगड, डोणजे येथील एस.एल.ऍडव्हेंचरचे लहू उघडे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेमध्ये तुषार दिघे, शंकर मरगळे, लहू उघडे यांनी देखील यशस्वीरित्या सहभाग नोंदवला.

एस.एल.ऍडव्हेंचरचे गिर्यारोहक अशा नवनवीन मोहिमेमध्ये नेहमीच अग्रेसर असतात. यापूर्वी खडपारशी (वानरलिंगी), ड्युक्‍स नोज, तैलबैला, कळकराई, लिंगाणा, तानाजी कडा यासारख्या अनेक मोहिमा यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत, अशा मोहिमांसाठी शिवाजी राजे क्‍लाइंबिंग वॉल आणि शिवदुर्ग लोणावळा यांचे सहकार्य वेळोवेळी लाभत असते, असे लहू उघडे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.