मुंबई – सध्या एनआयए संस्थेच्या ताब्यात असलेला निलंबीत एपीआय सचिन वाझे याचा पोलिस दलातील सहकारी रियाझ काझी यालाही आज एनआयएने ताब्यात घेतले आहे. वाझे यांच्या गैरकारभारात काझीनेही मदत केली होती अशी माहिती तपासात उघड झाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.
अँटिलिया इमारती जवळ स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्याच्या प्रकरणात काझीही सहभागी होता अशी माहिती एनआयएला मिळाल्याची माहिती संबंधीत सूत्रांनी दिली आहे. त्यांना अटक करण्यात आल्यानंतर आता या प्रकरणात जादा प्रकाश पडू शकेल असे सांगितले जात आहे.
वाझे यांच्या घरातून सीसीटीव्ही फुटेज डीव्हीआर घेऊन जाणारा काझीच होता असेही तपासात निष्पन्न झाल्याचे सांगितले जात आहे. अँटिलिया स्फोटके प्रकरण व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात वाझेंचे पुरावे नष्ट करण्याच्या कामात काझीचा पुढाकार होता अशी माहितीही पुढे आली आहे.