सासवड – पुरंदर तालुक्यातील भिवरी येथे जयती जैनम् साधना तीर्थतर्फे दि. 6 ते 31 ऑक्टोंबर या कालावधीत ‘वे ऑफ लाईफ’ या विषयावर ऑनलाइन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. श्रमणी अक्षयश्री आखा जी. म. सा हे मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यशाळेत दुपारी 3 ते 4 या वेळेत संपूर्ण जगभरातील श्रावक- श्राविका या कार्यशाळेत सहभाग घेऊ शकतात. या कार्यशाळेत दरररोजच्या धकाधकीच्या जीवनात येणारे ताण- तणाव, निद्रानाश, इतर कौटुंबिक समस्या यावर मार्गदर्शन करणार आहेत.
व्यक्तिमत्व विकास, आरोग्यदायी जीवनशैली, समुपदेशन यावर श्रमणी अक्षयश्री आखा जी. म. सा. हे मार्गदर्शन करणार आहेत. अधिक माहितीसाठी आणि सहभागी होण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1346467172359651/