पुणे – थंडीची चाहूल लागल्याने फळांना मागणी घटली आहे. आवकेच्या तुलनेत मागणी घटल्याने पेरू, बोरे, लिंबाच्या भावात घसरण झाली आहे. घाऊक बाजारात लिंबाच्या 15 किलोंच्या गोणीमागे 40 ते 50 रुपये तर पेरू आणि बोरांच्या भावात दहा किलोमागे अनुक्रमे दहा ते तीस टक्क्यांनी घट झाली आहे.
बाजारात कलिंगडाची आवक वाढू लागली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक निम्म्याने घटल्याने डाळींबाचे भाव किलोमागे वीस ते पंचवीस टक्क्यांनी वधारले आहेत. उर्वरित अन्य फळांची आवक आणि मागणी कायम कायम असून भाव स्थिर राहिल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
रविवारी येथील बाजारात केरळ येथून अननस 3 ट्रक, मोसंबी 50 ते 60 टन, संत्री 25 ते 30 टन, डाळिंब 30 ते 35 टन, पपई 10 ते 15 टेम्पो, लिंबे तीन ते साडे तीन हजार गोणी, पेरू 1 हजार क्रेट्स, चिक्कू 1 हजार बॉक्स, कलिंगड 7 ते 8 टेम्पो, बोरे 1 हजार ते 1200 गोणी, सफरचंद 4 ते 5 हजार पेटी, किन्नोर दीड ते दोन हजार बॉक्स तर खरबुजाची 8 ते 10 टेम्पो आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे :
लिंबे (प्रति गोणी) : 70-130, अननस (डझन) : 70-270, मोसंबी : (3 डझन) : 220-480, (4 डझन ) : 80-180, संत्रा : (10 किलो) : 100-400, डाळींब (प्रति किलोस) : भगवा : 50-200, गणेश : 10-30, आरक्ता 20-60. कलिंगड : 8-14, खरबुज : 15-25, पपई : 5-12, चिकू : 100-500, पेरू : 100-300, सफरचंद : काश्मिर डेलिशिअस (15 ते 16 किलो) 1000-1600, किन्नोर (25 ते 30 किलो) 2800-3500, गोल्डन (10 किलो ) 1300 ते 1500, अमेरिकन (15 ते 16 किलो) 1200-1500, परसिमन (10 ते 12 किलो) 2600-3000, बोरे (10 किलो) चमेली : 50-90, उमराण : 30-35, चेकनट : 300-350, चण्यामण्या 400-450.