कार्ला, (वार्ताहर) – मावळ तालुक्यात पावसाची संततधार कायम आहे. तर विकेंडला मुसळधार पाऊस बरसला होता. शनिवार-रविवार सलग दोन दिवस झालेल्या अतिमुळधार पावसामुळे कार्ला येथील एकविरा देवी मंदिराकडे जाणाऱ्या कार्ला गडाच्या पायऱ्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते.
पायऱ्यांना जणू धबधब्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. पाऊस अधिक झाल्याने नागरिकांसह पर्यटकांची तारंबळ उडाली होती. लोणावळा, कार्ला परिसरातील देवले – मळवली, वेहरगाव – कार्ला, सदापूर – मळवली – बोरज रस्त्यांवर पाणी आल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती.
उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी, कर्मचारी विविध ठिकाणी भेट देत होते. तसेच पोलीस पाटलांच्या संपर्कात राहून कुठे आपत्ती ओढवणार नाही, याची काळजी घेत होते.