पाटण (प्रतिनिधी)– कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने धरणातून आजपासून ५८०० क्युसेक पाणी कोयना नदीच्या पात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोयना धरणातील पाणी पातळी 2144′ 03″ फूट असून सध्याचा पाणीसाठा 82.75 टीएमसी झाला आहे.
पाणलोट क्षेत्रात कालपासून जोरदार सरी कोसळत असल्याने धरणात सध्याची आवक 41389 क्यूसेक होत आहे. त्यामुळे आज सकाळी 11 वाजता धरण पायथा वीजगृहातून 2100 क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात येत आहे.
तसेच दुपारी 2.00 वाजता रेडियल 9 इंच उचलण्यात येत आहेत. त्यावेळी एकूण विसर्ग 2100 क्यूसेक वरून 5800 क्यूसेक असेल, अशी माहिती प्रशासनाने दिली.