पुण्याच्या काही भागांत शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे- शहराच्या काही भागांतील पाणीपुरवठा शनिवारी (दि. 26) बंद ठेवण्यात येणार आहे. पर्वती, बंडगार्डन व नवीन लष्कर जलकेंद्र अखत्यारीतील पाइपलाइनच्या देखभाल-दुरुस्तीचे काम शनिवारी सकाळी 9 ते रात्री 9 दरम्यान हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारपासून (दि. 27) या सर्व भागातील पाणीपुरवठा पूर्ववत होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

 

पाणीपुरवठा बंद असणारे भाग- कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, केशवनगर, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी, हांडेवाडी रोड, फुरसुंगी, फातिमानगर, एनआयबीएम, घोरपडी, बीटी कवडे रोड, रामटेकडी, मीठानगर, वैदूवाडी, बिबवेवाडी संपूर्ण परिसर, मार्केट यार्ड, डायस प्लॉट, गुलटेकडी, सहकारनगर, भवानी पेठ, गंज पेठ, घोरपडी पेठ, मुकुंदनगर, सॅलिसबरी पार्क, महर्षीनगर, पद्मावती, इंदिरानगर, बालाजीनगर, तळजाई वसाहत, धनकवडी, खराडी, चंदननगर, हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, दत्तनगर, आंबेगाव पठार, कात्रज, कोंढवा बुद्रुक, शिवाजीनगर, कोथरूड, गोखलेनगर, शास्त्रीनगर, घोले रोड, आपटे रोड.

 

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.