पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील जलउपसा केंद्र आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्राचा विद्युत पुरवठा व पाणीपुरवठा संबंधित काम गुरूवारी केले जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहराचा गुरुवारचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे यांनी केले आहे.