पिंपरी – महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युतविषयक देखभाल दुरूस्ती व अन्य कामांसाठी गुरुवारी (दि. 1) शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.
त्यामुळे त्या दिवशी शहराला सकाळी पाणीपुरवठा करण्यात येईल. मात्र, शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा करण्यात येणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.
दुरूस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शहरातील सर्व भागात दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (दि. 2) होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे.
पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेकडून निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत व पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल-दुरूस्तीची आवश्यक कामे करण्यात येणार आहेत.