शुक्रवारी उशिरा आणि कमीदाबाने येणार पाणी
पुणे –पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉ-वॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्र तसेच लष्कर जलकेंद्र, एसएनडीटी/वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग स्टेशन येथे विद्युत/पंपिंग विषयक आणि स्थापत्य विषयक कामे करण्यात येणार आहेत.
त्यासाठी उपनगरांसह संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (दि.16) संपूर्ण दिवस बंद राहणार आहे. शुक्रवारी (दि.17) उशिरा आणि कमीदाबाने पुरवठा होणार आहे.
शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वती गाव, सहकारनगर, सातारा रस्ता परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परिसर, कर्वेरस्ता, एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रस्ता, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे नं. 42, 46, पर्वती टॅंकर भरणा केंद्र, पद्मावती टॅंकर भरणा केंद्र, हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी परिसर, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधान, बाणेर, चांदणीचौक, किष्किंधा नगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे विद्यापीठ परिसर, वारजे हाय-वे परिसर, वारजे-माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलर नगर, अतुल नगर, शाहु कॉलनी, वारजे जलशुद्धीकरणाचा परिसर, औंध-बावधन, सूस, सुतारवाडी, भूगाव रस्ता परिसर, लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगररस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनी, वडगावशेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी, विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगररस्ता आदी भागांत पाणी बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.