पुणेकरांच्या पाण्याचा हिशेब सुरू

महापालिकेकडून वॉटर ऑडिट : नेमका वापर शोधणार

अशी होईल तपासणी

पाण्याची होणारी गळती आणि प्रत्यक्षातील वापर तसेच लोकसंख्येनुसार पाण्याची किती आवश्‍यकता आहे, याबाबतची योग्य माहिती समजण्यासाठी पाण्याचे ऑडिट आवश्‍यक आहे. ते झाल्यास पुणे शहराच्या पाण्याची अचूक गरज समजण्यास मदत होणार आहे. त्यानुसार, महापालिकेच्या वतीने वॉटर ऑडिट करण्याचे काम सुरूदेखील झाले आहे. त्यासाठी सर्व पाणीटाक्‍यांवर मीटर बसविण्यात येणार आहे. तसेच मुख्य पाण्याची लाइन, मुख्य लाइनला जोडणाऱ्या लाइन, क्रॉस होणाऱ्या लाइन या सर्व ठिकाणी मीटर बसविण्यात येणार आहेत. या सर्व मीटरची संख्या सुमारे 350 असून आतापर्यंत 60 ठिकाणी हे मीटर बसविण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.

महापालिकेकडून वॉटर ऑडिट : नेमका वापर शोधणारपुणे -जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार, पुणे महापालिकेने पाणी वापराचे वॉटर ऑडिट सुरू केले आहे. त्यासाठी प्रमुख जलवाहिन्यांवर 350 मीटर बसविण्यात येत आहे. यामुळे प्रत्यक्ष जलकेंद्रातून जलवाहिनीत किती पाणी गेले आणि जलवाहिनीतून पुढे नागरिकांना किती पाणी मिळाले, याची माहिती उपलब्ध होणार असून नेमकी गळतीही समोर येणार आहे.

महापालिका आणि जलसंपदा विभागातील पाणी करार फेब्रुवारी 2019 मध्ये संपुष्टात आला आहे. या करारानुसार, महापालिकेस प्रती वर्षाला 11.50 टीएमसी पाणी कोटा मंजूर करण्यात आला आहे. मात्र, शहराच्या लोकसंख्येने 52 लाखांचा आकडा गाठला असून महापालिकेची हद्दवाढ होत आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिकेस प्रती वर्ष 17 टीएमसी पाणी नवीन कराराद्वारे देण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे करण्यात आली होती. मात्र, “एवढे पाणी हवे असल्यास आधी वॉटर ऑडिट करावे आणि पाण्याचे अंदाजपत्रक तयार करावे. त्यानंतरच या कोट्याची मागणी शासनाकडे करावी,’ असे पत्र जलसंपदा विभागाने पालिकेस दिले होते.

मात्र, त्यासाठी कालावधी लागणार असल्याने महापालिकेने पुन्हा जलसंपदा विभागास पत्र पाठवून “या दोन्ही बाबी पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने सुधारित पाणी करार ऑगस्ट 2019 मध्ये करावा. तो पर्यंत आवश्‍यक असलेला करार कायम ठेवावा,’ अशी विनंती केली होती. त्याला जलसंपदा विभागाने मान्यता दिली आहे.
दरम्यान, आता मीटर बसविण्याचे काम प्रगतीपथावर असले, तरी त्यातून नेमके किती प्रमाणात पाणी वाया जाते, याची योग्य नोंद होणे गरजेचे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.