कळस, धानोरी, लोहगावात ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा

पुणे – महापालिकेच्या नवीन होळकर जलशुद्धीकरण केंद्राकडून विद्यानगरकडे जाणारी मुख्य जलवाहिनी मुळा नदीच्या आत फुटल्याने कळस, धानोरी, लोहगाव, विमाननगर तसेच विश्रांतवाडीच्या काही भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांच्या घशाला कोरड पडली आहे. सध्या या भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात असून पाणी भरण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे.

होळकर जलशुद्धीकरण केंद्रातून टिंगरेनगर जलकेंद्राला १ हजार मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जातो. ही जलवाहिनी रविवारी (दि. ७) पहाटे साप्रसजवळील मुळा नदीपात्रात फुटल्याने टिंगरेनगर केंद्रावर अवलंबून असलेल्या सर्व भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. टिंगरेनगर जलकेंद्रातून लोहगाव, धानोरी, टिंगरेनगर, मुंजाबावस्ती, कलवडवस्ती, विश्रांतवाडी व विमाननगरच्या काही भागाचा पाणीपुरवठा मागील ३ दिवस ठप्प झाला आहे. परिसराला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टँकरमधील पाणी भरण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.