पुणे – महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून रामटेकडी ते खराडी भागात जाणाऱ्या महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर फ्लो मीटर बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या गुरुवारी (दि.2) रोजी हडपसर भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर, शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
पुणेकरांनो, आता २४ तासांत कधीही पाण्याची ‘तक्रार’ करा, हा आहे क्रमांक
पाणीपुरवठा बंद असणारा भाग
रामटेकडी जीएसआर टाकी – ससाणेनगर, काळे-बोराटेनगर, हडपसर गावठाण, ग्लायडिंग सेंटर, फुरसुंगी, सय्यदनगर, सातववाडी, इंद्रप्रस्थ, मगरपट्टा, वानवडी एसआरपीएफ व एआयपीटी, रामटेकडी, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, भारत फोर्स कंपनी एरिया, महंमदवाडी, हांडेवाडी रोड, गोंधळेनगर, माळवाडी, भोसले गार्डन, 15 नं. आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, महादेवनगर, मगरपट्टासिटी, मुंढवागाव, केशवनगर, भीमनगर, शिंदेवस्ती, शिर्केकंपनी, काळेपडळ, गाडीतळ, वैदूवाडी हडपसर, हेवनपार्क, भारत फोर्स कंपनी आणि परिसर.