जिल्ह्यातील धरणांमधून विसर्ग सुरू

पुणे : धरणक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे मुळशी धरणातून १५००० क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आहे. त्यामुळे नदीकाठची गावे, वाड्या ,वस्त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रामध्ये प्रवेश करू नये. वीजेवरील मोटारी, इंजिने शेती अवजारे योग्य त्याठिकाणी ठेवावी. तसेच जनावरांना योग्य ठिकाणी हालवावे. कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन टाटा पॉवर प्रशासन व मुळशी तहसीलदार कार्यालयांच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, भामा आसखेड धरण धरणातूनही पाण्याचा विसर्ग ११०५.००क्युसेकवरून १६५३.०० क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला आहे.

भाटघर:- 1510
निरादेवघर :-5110
गुंजवणी :- 1780
वीरधरण :- 13199

Leave A Reply

Your email address will not be published.