वाघोली (पुणे) – जिल्ह्याच्या अनेक भागात शुद्ध पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प राबवणे काळाची गरज आहे. या प्रकल्पाद्वारे नागरिकांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शांताराम बापू कटके यांनी केले.
वाघोली (ता. हवेली) येथील बकोरी रस्त्यावरील ऑक्सी व्हॅली फेस 2 सोसायटीमध्ये पाणी शुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. या प्रकल्पाचे उद्घाटन वाघोलीचे माजी उपसरपंच तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शांताराम बापू कटके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे, कार्यकर्ते संतोष दातार, सोसायटीचे चेअरमन आदिनाथ गाडे आदी उपस्थित होते. यावेळी कटके बोलत होते.
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सोसायटीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमास सोसायटीतील पदाधिकारी सूरज पाटील, संतोष जाधव, युवराज निपाणकार, देविदास गाडे, अक्षय गाडे, अबीद शेख, नितीन आव्हाळे, सोमनाथ भैस, संजय संभे आदी उपस्थित होते.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा