मावळातील डोंगरवाडीत हंडाभर पाण्यासाठी कोसोदूर पायपीट

पाणी टंचाई : डोंगरवाडी परिसरात पाण्यासाठी वणवण

टाकवे बुद्रुक – आंदर मावळातील सह्याद्रीच्या कडेपठारावर वसलेल्या डोंगरवाडीत हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. परिसरात असलेल्या चार विहिरीपैकी तीन विहिरी आटल्या असून, गावापासून एक किलोमीटर उंच चढणीवर असलेल्या एकमेव विहिरीचे पाण्यासाठी महिला गर्दी करीत आहेत. विहीर गावापासून लांब असल्याने संपूर्ण दिवस महिलांचा पाणी भरण्यात जातो; मात्र या विहिरीने पाण्याचा तळ गाठल्यास पाण्याचा मोठा प्रश्‍न निर्माण होणार आहे. गावात अंतर्गत सिमेंट कॉंक्रेटचे रस्ते, वीज, प्राथमिक शाळा या मुलभूत सुविधा आहेत. मात्र परिसरात पाण्याची तीव्र टंचाई असल्याचे दिसून येते आहे.

या संदर्भात चंद्रभागा मोरमारे म्हणाल्या की, पॉलिहाऊस, पोल्ट्री फार्ममध्ये आम्ही कामाला जात होतो, आता दिवस पाणी भरण्यात जायला लागल्याने महिन्याचा रोजगार बुडत आहे. आशा मोरमारे, मीरा मोरमारे, कलाबाई मेमाणे, सोनाबाई खाडे, चांगुणा रावते यांनी पाण्याची व्यथा मांडली. गावाजवळील विहिरीत पाणी राहिले नसल्याने महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट पाहवत नाही. ग्रामपंचायतीने पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी रामदास खाडे यांनी केली असून अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.