बोपोडीतील हॅरिस पुलाखालील रोडवर पाणी, वाहतूकीसाठी रस्ता बंद

पुणे (बोपोडी) : गेल्या 24 तासात शहरात सर्वच ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. शहरातील सर्वाधिक पाऊस सहकारनगर धनकवडी भागात तब्बल 150 मिमी पाऊस झाला आहे, तर शिवाजीनगर भागात 131 मिमी पाऊस झाला असून कोथरूड मध्ये 120 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जोरदार पावसामुळे मुळा नदीतील पाणी वाढल्याने आणि सततच्या पावसामुळे बोपोडीतील हॅरिस पुलाखालील रोडवर पाणी साचले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुलाखालील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तरी वाहनचालकांने या मार्गाने जाणे टाळावे अशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)