कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

केवळ दोन ते पाच रुपये भाव : बारदान, हमाली व वाहतुकीचा खर्च निघणेही कठीण

चिंबळी- खेड तालुक्‍यात पाण्याच्या उपलब्धतेचा अंदाज घेत आणि पाणीटंचाईवर मात करून अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देऊन कांद्याची लागवड केली. सध्या कांद्याची काढणी अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, वर्षभर राबऊन बाजारात आणलेल्या कांद्याला केवळ दोन ते पाच रुपये भाव मिळत असल्यामुळे कुरुळी, चिंबळी, मोई, निघोजे, केळगाव, मरकळ, सोळू, धानोरे परिसरातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हवामानात उकाडा वाढल्यानंतर कांदा नासण्याची शक्‍यता अधिक असते. सध्या उकाडा वाढला नसला तरी 15 ते 20 दिवसांत उकाडा वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे साठवणुकीला ठेवलेला कांदा शेतकऱ्यांनी बाहेर काढला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक बाजारपेठेत होऊ लागल्याने ग्राहक कमी आणि आवक जादा अशी विरोधाभास परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या गाड्या उभ्या राहू लागल्या आहेत. परिणामी कांदा दोन-तीन रुपये किलोने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

कांद्याचे भाव धडकन कोसळून दोन रुपये किलोवर आल्याने शेतकऱ्यांना बारदान, हमाली व वाहतुकीचा खर्च निघणेही कठीण झाले आहे. मागील वर्षापाठोपाठ सलग यावषीर्ही कांदा पिकाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आणले असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

  • … तरीही परिस्थितीत फरक पडला नाही
    भारत सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांतून जोर धरू लागली आहे. गेल्या वर्षभरापूर्वी भारत सरकारने कांदा निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेऊन कांद्याचे भाव नियंत्रणात आणले होते. कांद्याचे भाव स्थिर राहावेत म्हणून शेजारील पाकिस्तानातून हजारो टन कांद्याची आयात केली गेली होती. या निर्णयांमुळे देशांतर्गत कांद्याचे भाव पडले होते. आज वर्षभरानंतरही या परिस्थितीमध्ये काहीही फरक पडला नाही.
  • एक हजार रुपये अनुदान द्या
    कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केवळ 200 रुपये अनुदान देऊन बळीराजाची चेष्टा केली आहे. त्यामुळे किमान 1200 रुपये क्विंटल भाव द्यावा किंवा प्रति क्विंटल किमान एक हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी खेड तालुक्‍यामधील शेतकऱ्यांमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)