अण्यात जलसंजीवनी चळवळ

चिल्हेवाडी उपसा-सिंचन योजनेच्या आखणीबाबत चर्चा

अणे – अणे पठार भागासाठी चिल्हेवाडी उपसा-सिंचन योजनेची आखणी करण्यासाठी पठारविभाग संस्थेने गुरुवारी (दि. 6) जलसंजीवनी चळवळ उभी केली. सकाळी 9 वाजता श्री रंगदास स्वामी सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आली होती.

सर्व पठार-विकास संस्थेचे सभासद जुन्नर तालुक्‍याच्या पूर्वे- दुष्काळी-पट्ट्याला सिंचनास पाणी मिळविण्यासाठी जल-संजीवनी चळवळ उभी केली. या सभेत महत्त्वाचे विषय म्हणजे पठार विकास संस्थेच्या सभासदांची संख्या वाढविणे, पठारावर सिंचनासाठी पाणी उपलब्धता, चिल्हेवाडी बंद पाइपलाइन योजना सविस्तर माहिती घेणे, कुकडी पाटबंधारे, जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्याकडून सुधारीत प्रकल्प अहवाल मागविणे, पाणी वाटप-वितरण सोसायटीची बांधणी करणे, पठार भागातील गावांसाठी पीक-आराखडा तयार करणे, कुकडी पाटबंधारे जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्याकडून सुधारित प्रकल्प अहवाल मागवणे, अशा अनेक विषयांवर चर्चा झाली आहे. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मते मांडली. यावेळी आणे-आनंदवाडी, नळवणे, शिंदेवाडी, पेमदरा येथील सर्व शेतकरी सभेला उपस्थित होते.या सभेला ग्रामस्थांचा चांगला सहभाग लाभला. यावेळी श्री रंगदास स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष विनायक आहेर, ग्राहक मंचाचे बाळासाहेब औटी, भास्कर आहेर, नळवणे गावाचे सरपंच तुषार देशमुख, शिंदेवाडीचे सरपंच रोहिदास शिंदे, पेमदरा सरपंच रंगनाथ बेलकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.