फुकुशिमा अणू केंद्रातील पाणी जपान समुद्रात सोडणार

टोकियो  – नष्ट झालेल्या फुकुशिमा अणु प्रकल्पातून 10 लाख टन दूषित पाणी समुद्रात सोडले जाईल, असे जपानचे म्हणणे आहे. मात्र चीनने त्याला अत्यंत बेजबाबदार म्हटले आहे, तर दक्षिण कोरियाने सेऊलमधील जपानच्या राजदूतांना पाणी सोडण्याचा निषेध करण्यासाठी पाचारण केले. अणू प्रकल्पातील किरणोत्सर्गी पाणी सोडण्याची प्रक्रिया दोन वर्षात सुरू होणार आहे. पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी पाण्याचे फिल्टरिंग सुरू करण्याची वेळ.

आल्याने टोकियो इलेक्‍ट्रिक पॉवरची हानिकारक जलसाठा काढून टाकावा लागणार आहे. त्यासाठी आवश्‍यक नियामक मंजुरी घेतली गेली आहे.
2011 मध्ये झालेल्या भूकंप आणि त्सुनामीमुळे या प्रकल्पाचे प्रचंड नुकसान झाल्याने किरणोत्सर्ग झालेले पाणी सोडणे आवश्‍यक आहे असे मत जपानने व्यक्त केले आहे. जगभरातील अणू प्रकल्पांमधून असेच फिल्टर केलेले पाणी नियमितपणे सोडले जाते, असेही जपानने म्हटले आहे.
सुमारे 1.3 दशलक्ष टन दूषित पाणी सुमारे 100 अब्ज येन (912.66 दशलक्ष डॉलर) च्या किंमतीचे मोठ्या टॅंकमध्ये साठवलेले आहे आणि या टाक्‍यांमधील जागा आता अपुरी पडायला लागलेली आहे. या टाक्‍या ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या पोहण्याच्या स्पर्धांसाठीचे 500 तलाव मावतील एवढी प्रचंड आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.