पुणे : लॉकडाऊन अंशतः शिथिल होताच पालिकेकडून शहरात अत्यावश्यक कामे सुरू करण्यात आली आहेत कर्वे रस्त्यावर सोनल हॉल जवळ बुधवारी पहाटे जेसेबीने खोदाई सुरु असताना काही नळजोड तुटले आहेत. त्यामुळे या भागात रात्री पासून पाण्याचे फवारे उडत आहेत.
सकाळी ही बाब सामोर आल्यानंतर या परिसरातील स्थानिक नागरिकांनी नगरसेवक तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ही माहिती कळविली पण गळती उशीरा पर्यंत सुरूच होती.