सातारा (प्रतिनिधी) – शहापूर योजनेच्या पाणी उपसा पंपामध्ये बिघाड झाल्यामुळे पुढील बारा दिवस शहरातील काही भागांमध्ये एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन नगराध्यक्षा माधवी कदम यांनी केले आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार शहापूर योजनेच्या माध्यमातून उरमोडी नदीतून पाणी उपसा करण्यासाठी वापरण्यात आलेल्या 200 एचपीच्या पंपामध्ये बिघाड झाला आहे. या पंपाच्या दुरूस्तीसाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या योजनेतून होणारा पाणी उपसा 50 टक्यांवर येणार आहे. त्यामुळे कास व शहापूर योजनांतून पाणीपुरवठा होणाऱ्या भागांमध्ये 21 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पाणी पुरवठा सभापती यशोधन नारकर यांनी दिली .
नियोजनानुसार वारनिहाय पाणीकपात करण्यात येणाऱ्या भागांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. सोमवारी – भैराबा टाकीवरून वितरीत करण्यात येणारे शुक्रवार पेठ, गडकर आळी परिसर. राजवाडा टाकीवरून वितरित करण्यात येणारा तांदुळ आळी, मोती चौक ते देवी चौक ते लक्ष्मी हॉटेल, गोरक्षण बोळ, शनी मारूती मंदिर पिछाडी परिसर, मोती चौक ते 501 पाटी ते औंधकर मळा, मोती चौक ते राधिका टॉकीज ते अमृता नर्सिंग होमअखेर परिसर. पंपिंग लाईनवरून वितरीत होणारा टोपे मामा दत्तमंदीर ते घोरपडे कॉलनी ते काकडे बोळ परिसर तसेच जुना दवाखाना कोपरा लाईन.
मंगळवार – व्यंकटपुरा टाकीवरून वितरीत होणारा व्यंकटपुरा, धननीची बाग, कारंडबी नाका परिसर, तसेच सकाळ सत्रातील पोळ वस्ती, पॉवर हाऊस झोपडपट्टी परिसर व चिमणपुरा पेठ. घोरपडे टाकी (दुपार सत्र) कुंभारवाडा, कोल्हाटी वस्ती, चार भिंती टाकी ते कूपर कारखाना अखेर असणाऱ्या चार बैठ्या टाक्या घंटेवारी. बुधवार – कोटेश्वर टाकीवरून वितरीत होणारा शुक्रवार पेठ, प्रतापगंज पेठ, बुधवार नाका, नामदेववाडी परिसर. घोरपडे टाकीतून सकाळ सत्रात वितरण होणारा राजलक्ष्मी पिछाडी, शेटे चौक परिसर, नालबंद वाडा परिसर ते खड्डा मशीद, दत्तमंदिर ते कमानी हौद, राजसपुरा पेठ, दुर्गा पेठ.
गुरूवार – कात्रेवाडा टाकीवरून वितरीत करण्यात येणारा रामाचा गोट, गवंडी आळी, मंगळवार तळे, कोल्हटकर आळी, नागाचा पार, मनामती चौक परिसर. गुरूवार टाकी पहिला झोन कूपर कारखाना ते पिसाळ आर्केड, शाहू गार्डन पिछाडी ते तरडे घर ते शिर्के हौद, पिसाळ आर्केड ओढ्यातील भाग, घोरपडे कॉलनी ते केसरकर पेठ, पार्टे घर, सूर्यवंशी वस्ती, जुना दवाखान्यातील काही भाग. गुरूवार टाकी दुसरा झोनमधील गुरूवार पेठ जमदाडे घर ते शिर्के शाळा, शिर्के शाळा ते कमानी हौद पिछाडी, शिर्के शाळा ते पटवर्धन गॅरेज, शनिवार पेठ कल्पक सहवास अपार्टमेंट परिसर ते वाघाची नळी परिसर ते न्यू इंग्लिश स्कूल कोपरा ते खणआळी व लंबे बोळ परिसर. गणेश टाकीवरून वितरीत होणारा समर्थ मंदीर चौक ते हत्तीखाना, सोमवार पेठ परिसर, बागवान गल्ली, दैवज्ञ मंगल कार्यालय चौक ते न्यू इंग्लिश स्कूल कोपरा परिसर, जानकीबाई झंवर शाळा परिसर, खडकेश्वर शाळा परिसर.
शुक्रवार – सकाळी सहा ते आठ कबीर सोसायटी व पोळवस्ती, पापाभाई पत्रेवाला चाळ, चिमणपुरा पेठ, गारेचा गणपती, मनामती चौक, नागाचा पार, पद्यावती मंदिर परिसर, होलार समाज मंदिर परिसर, मंगळवार पेठ, ठक्कर कॉलनी, बोगदा ते समर्थ मंदीर परिसर, धस कॉलनी परिसर, दस्तगीर नगर परिसर. बुधवार नाका टाकीवरून वितरीत होणारा बुधवार नाका ते बाबर कॉलनी, एकता कॉलनी, रघुनाथपुरा, शेंडे कॉलनी परिसर.
रविवार – बोगदा परिसर, खापरी लाईन नंबरवरून वितरीत होणारा बोगदा ते माची पेठ, अदालतवाडा परिसर, बालाजी अपार्टमेंट परिसर, कांबळे वस्ती, जांभळे वाडा परिसर लाईन. यशवंत गार्ड पहिला झोनमधील भवानी शाळा, एलबीएस कॉलेज परिसर, रावखंडे बोळ परिसर, दुर्गा पेठ, रविवार पेठ सर्वोदय कॉलनी, लोणार गल्ली, कैकाड गल्ली, ते मरिआई कॉम्प्लेक्स, जगताप कॉलनी, पंताचा गोट परिसर, खंडोबा माळ, वडार वस्ती ते बडेकर वस्ती व कांबळे वस्ती, मल्हार पेठ परिसर.
यानुसार ठराविक वाराला त्या-त्या परिसरात पाणी कपात होणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी पाण्याचे नियोजन करावे असे आवाहन नगराध्यक्षा कदम, मुख्याधिकारी अभिजित बापट, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे व पाणीपुरवठा सभापती यशोधन नारकर यांनी केले आहे.