गोंदवले खुर्दमध्ये वॉटर कपला सुरुवात

गोंदवले – दुष्काळाचा कलंक पुसून गाव पाणीदार करण्यासाठी गोंदवले खुर्दने आज श्रमदानाचा उचांक करत वॉटर कप जिंकायचाच या निर्धाराने भल्या सकाळी सुमारे 1400 ग्रामस्थ युवक आणि महिलांनी श्रमदानात सहभाग घेऊन पाणी अडविण्याच्या दृष्टीने जोरदारपणे कामाला सुरुवात केली. यावर्षी 8 एप्रिल या दिवशी वॉटर कप स्पर्धेला सुरूवात झाली असून सलग 45 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. आज सोमवार बरोबर पहाटे 5 वाजता सगळा गाव जागा झालेला होता. प्रत्येकाची आपली काम उरकून सगळे जण वॉटर कपला जाण्यासाठी घाई करत होता. ग्रामदैवत मारुती मंदिराच्यासमोर सगळे जमा झाले. एक प्रार्थना करण्यात आली आणि सुरू झाल एक मिशन ट्रॅक्‍टर ट्रॉली, रिक्षा, दुचाकी या वाहनातून रॅलीद्वारे सगळे कामाच्या ठिकाणी पोहचले. सगळा भुंडा असणारा माळ रंगीबेरंगी झाला.

याठिकाणी सर्वांना एकत्र बसवून 45 दिवसांचे नियोजन संगण्यात आलं व तांत्रिक बाबींची माहिती देत आपणाला करावयाचे काम हे तंत्र शुध्द पध्दतीने करायचे आहे असं सांगत कामाला सुरुवात झाली. सकाळी सकाळी माळरानावर खण खण असा आवाज येत काळ्या मातीची सेवा करण्याचं काम सुरू झाले सगळे गावकरी महिला युवक युवती अगदी एका कुटुंबातील असल्याप्रमाणे काम करत होते. त्याचबरोबर वयोवृध्द त्यांचे आत्मबल वाढवत होते. अनेक महिला भगीणी ज्या कधीही स्वतःच्या रानात शेतात गेल्या नाहीत आशा महिला भगीणी लहान बाळांना घेऊन या श्रमदानात सहभागी झाल्या होत्या.

त्यांचा उत्साह खूप वाढला होता. सध्या लोकसभेचे इलेक्‍शन सुरू असून माढा मतदार संघाचे उमेदवार संजय शिंदे यांनी एका कार्यक्रमाला या रस्त्याने जाताना हे श्रमदानाने दृश्‍य पाहिले आणि त्यांनी तात्काळ तिथे भेट देऊन मला मतदान करा हे न म्हणता भाषणबाजीपण करता त्यांनी चक्क स्वत: टिकाव घेऊन लोकांच्या बरोबर श्रमदान करायला सुरुवात केली. दोन तासात खूप काम लोकांनी केलं आता यापुढेही 45 दिवस असच जोमाने काम करणार आहे अशी प्रतिक्रिया दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.