पाण्याच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी

बारामतीच्या दरेकरवाडीतील घटना : परस्परविरोधी तक्रारीवरून 13 जणांवर गुन्हा

बारामती- शेतातील विहिरीच्या पाण्याच्या वादातून सोनगाव येथे नात्यातील दोन कुटुंबात जोरदार मारामारी झाली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून पोलिसांनी दोन्ही गटांच्या 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (दि. 15) दरेकरवस्तीत घडली.

ऋषिकेश हनुमंत यादव, हनुमंत निवृत्ती यादव, रोहित हनुमंत यादव, लता हनुमंत यादव (सर्व रा. वाणेवाडी, ता. बारामती), जयश्री अंकुश महाडीक, अंकुश तुकाराम महाडीक (रा. सोनगाव, ता. बारामती) व दोन अनोळखी व्यक्‍ती अशा आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी महेश पांडूरंग महाडीक (रा. दरेकरवस्ती, सोनगाव, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.

तुम्ही अंकुश महाडीक यांना विहिरीचे पाणी का देत नाही असे म्हणून बेकायदा गर्दी जमवून घरात घुसून खुर्च्यांची मोडतोड करत कपडे अस्ताव्यस्त फेकून देत फिर्यादी, त्यांचे आई-वडील, भाऊ, चुलती यांना काठीने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दुसऱ्या बाजूने ऋषिकेश यादव यांनी फिर्याद दाखल केली. कमल शिवाजी महाडीक, कल्पना पांडूरंग महाडीक, महेश पांडूरंग महाडीक, राजेंद्र पांडूरंग महाडीक, पांडूरंग तुकाराम महाडीक (रा. दरेकरवस्ती, सोनगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे त्यांचे आई-वडील, भाऊ यांच्यासोबत दरेकरवस्ती येथे आले असताना आरोपींनी बेकायदा गर्दी, जमाव जमवून तुम्ही इथे कशाला आला आहात, तुमचा काय संबंध आहे, आमचा अंकुश तुकाराम महाडिक यांच्याबरोबर विहिरीच्या पाण्यावरुन वाद सुरू आहे. तुम्ही आमच्या वादात पडू नका, असे म्हणून आरोपींनी काठीने, दगडाने मारहाण करत दुखापत करून शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादित नमूद केले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.