परतीच्या पावसाने दिवाळी सणावर पाणी

सातारा – साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्यानिमित्त सोने-चांदी खरेदीसाठी सराफ बाजारात साताकरांची गर्दी होत आहे. विशेष म्हणजे, सोन्याचा दर 39 हजार रुपयांच्या जवळपास पोहोचला असतानाही ग्राहकांची संख्या कमी झालेली नाही. नजीकच्या भविष्यात सोन्याचे दर कमी होण्याची चिन्हे नसल्याने गुंतवणूक म्हणूनही दिवाळीच्या मुहूर्तावर सातारकरांची सोने खरेदी जोरात सुरू आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेला मंदीने ग्रासले असताना सणासुदीमुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. बुधवारी सोन्याचा दर 38 हजार 830 प्रति तोळा तर चांदीचा दर 45 हजार 500 प्रति किलो होता. सोन्याचे बार, नाणी किंवा गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा दागिने घेण्यात सातारकरांना असलेली रुची आजही तशीच आहे. दरवर्षी सराफ बाजारात कोट्यवधींची उलाढाल होते; परंतु सणासुदीमुळे दर वाढल्याने परिणाम जाणवतील, असे बोलले जात होते तरी त्याचा परिणाम आपल्या व्यवसायावर झाला नसल्याचे सराफांनी सांगितले. महिलांचा कल सोन्याच्या नाण्यांच्या खरेदीकडे असल्याचे दिसून येत आहे.

याशिवाय मंगळसूत्रे, अंगठ्या, नेकलेस, बांगडया, कानातल्या रिंगा व इतर दागिने, गोफ या पारंपरिक दागिन्यांच्या खरेदीकडे लोकांचा कल असल्याचे सांगण्यात आले. सोन्यावरील सीमा व आयात शुल्क सरकार कमी करेल आणि त्यामुळे सोन्याचे दर आटोक्‍यात येतील, ही आशा फोल ठरली आहे. उलट सोन्यावरील सीमा शुल्क अडीच टक्‍क्‍यांनी वाढवण्यात आले. त्यामुळे दहा टक्‍के असलेले सीमा शुल्क आता 12.5 टक्‍क्‍यांवर पोहोचले आहे. त्यामुळे सोन्याची दरवाढ झाली आहे. त्यानंतरही बाजारात सोन्याची झळाळी अद्यापही कायम असल्याचे दिसून आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.